प्रसाद शिरगावकरांच्या गझला हल्ली मनोगतावर वाचायला मिळत नसल्या तरी त्यांनी चांगल्या गझला मनोगतावर दिल्या आहेत. नुकतीच त्यांनी व श्री. वैभव जोशी ह्यांनी http://www.marathigazal.com/ नांवाचे संकेतस्थळ खास मराठी गझलांच्या प्रसाराच्या उपक्रमासाठी सुरू केले असल्याची बातमी आजच्या म.टा. च्या 'मुंबई टाईम्स' पुरवणीतल्या मराठी वेब ह्या सदरात वाचावयास मिळाली.
एका मनोगती गझलकाराला मिळालेली जाहिर प्रसिद्धी पाहून मन सुखावले. ह्या पूर्वीही खुद्द मनोगतावर व श्री. नंदन होडावडेकर ह्यांच्या ब्लॉग बद्दल माहिती वाचनांत आलेली होतीच. मुंबई टाइम्स ह्या पुरवणीतले आतल्या पानांवरचे कुठलेच लेख संगणकीय/आंतरजाल आवृत्तीत वाचावयास मिळत नाहीत त्यामुळे येथे त्यांचा दुवा देता येणे शक्य नाही.
प्रसादरावांचे अभिनंदन !