एखाद्या सुंदर चित्रावरचे रेशमी आवरण दूर करताना हात तितकाच हळूवार असावा लागतो. गुलजारच्या काव्यरचनेवर लिहीताना संवेदनाशील मनाची गरज असते आणि ह्याचा प्रत्यय हा लेख वाचल्यावर आला. गुलजारच्या काव्यातील निरनिराळे पदर इतक्या सुरेखपणे उलगडून दाखवले आहेत की जवाब नही. गुलजारचे चित्रपट हा एक वेगळा विषय ठरावा आणि भविष्यात त्यावरही वाचायला मिळेल अशी आशा आहे.
वर म्हटल्याप्रमाणे गुलजारच्या सर्व कविता सारख्या नसतात, पण ह्यावरून फक्त त्याच्या माणूसपणाची खात्री पटते. गालिबसारखे देव लोक सतत एकाच प्रतिभेने लिहू शकतात. किंवा जरी तसे नसले तरी ते ओळखण्याची पात्रता मर्त्य माणसांकडे नसावी. गुलजारच्या बाबतीत कदाचित 'गीला गीला पानी' सारखी गाणी एक व्यावसायिक तडजोड असावी. काही असो, गुलजारच्या बर्याच कविता इतक्या सुरेख आहेत की वाचल्यावर अवाक व्हायला होते. माझी एक अत्यंत आवडती कविता इथे दिल्याशिवाय राहवत नाही. (दुसरी अशीच 'पोर्ट्रेट ऑफ गालिब')
मुझको भी तरकीब सिखा दे यार जुलाहे
अक्सर तुझको देखा है के ताना बुनते
जब कोई तागा टूट गया या खत्म हुआ
फिरसे बांध के और सिरा कोई जोड के उसमें
आगे बुनने लगते हो
तेरे इस ताने में लेकिन
इक भी गाठ गिरह बुनतर की
देख नही सकता है कोई
मैने तो एक बार बुना था एक ही रिश्ता
लेकिन उसकी सारी गिरहे साफ़ नजर आती है मेरे यार जुलाहे
मुझको भी तरकीब सिखा दे यार जुलाहे
अप्रतिम लेखाबद्दल अनेक धन्यवाद.
हॅम्लेट