श्री. जीएस्,
लेख सुंदर, वाचनीय आहे. प्रत्यक्ष दर्शनाचा आनंद मिळतो. धन्यवाद. परंतु,
तो कार्यक्रम आटोपून गडाचा फेरफटका मारायला निघालो. महाद्वार, तिकडच्या तीन देवड्या , दारात माजलेले केतकीचे बन, शरभ शिल्प, भिरभिरणारे विविधरंगी चतुर आणि फुलपाखरे हे सारे बघण्यासारखे. अजुन एक विशेष म्हणजे झुळूझुळू वाहाणारा निर्मळ पाण्याचा झरा. टाकी तर बऱ्याच गडांवर असतात, पण झऱ्यांचे भाग्य एवढ्या उंचीवर फार थोड्यांच्या माथी.
माहुली गडाच्या तपशिलाची तहान वरील परिच्छेदाने भागली नाही. त्यामानाने प्रवासाचे वर्णन झकास जमले आहे. असो.
पुढील गिरिभ्रमणासाठी शुभेच्छा...!
अवांतर: शुद्धीचिकित्सकाचा वापर वाचनाचा आनंद वाढवू शकेल.