'इ' लावा 'उ' लावा की 'आय' लावा आडनांवे बदलतात !
माणसे नाही..... !
दलित मराठी माणूस हा प्रकार मात्र प्रथमच ऐकीवात आला. अर्थात "ह्या" जातीवाचक ज्ञानांत आमची गाडी जरा मागेच आहे. करणार तरी काय तांबे, साठे, आपटे म्हणजे नक्की कोण ते आजकाल कळतच नाही !
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेतलेल्या दलित पुढाऱ्यांची नांवे कानावरून गेल्यास बरे होईल... शक्य झाल्यास कॉम्रेड साहेबांनी त्यांचे कार्यही विस्तृतपणे द्यावे कारण मो. बा. दोंदे, पीटर अलवारीस, अत्रे ही काही खुप मोठी नांवे त्यावेळी नव्हती. हम्मम्म स. का. पाटलांच्या नावाचे एक उद्यान आहे चर्नीरोड व मरिन लाईन्स च्या मध्ये... ते व व्हाण साहेब संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या फक्त बाजूचे होते (असे दाखवायचे). सिडींनी राजिनामा वगैरे देवून चुकच केली होती असे मला वाटते. मराठी माणूस नको तितका श्यामळू आहे..... माझ्या सारखा असता तर त्या काळच्या पंतप्रधानाच्या छाताडावर बसून बेळगाव/निप्पाणी वसूल केले असते. मग भले तो मोरारजी भाई (ज्युस सेंटर चा चालक/मालक) तिकडे बोंबलत बसला असता तरी चालले असते.
अर्थात महाराष्ट्राच्या नेत्यांनी (?) आजही दिल्लीकरांची तळी राखण्याचेच काम चालवलेले आहे- (वारसा हक्क कोण नाकारु शकेल ?)
कॉम्रेड साहेबांनी मात्र आठवणींना उजाळा दिला (माझ्या नव्हे माझ्या मातोश्रीच्या... कारण ती ही संयुक्त महा. चळवळीतली एक दुर्लक्षीत कार्यकर्ती होती !)