विनायकांच्या संपूर्ण लेखाशी पूर्णत: सहमत आहे.
बघा, काय करायचे चॉईस आपला आहे!
चॉईस हा अमराठी शब्द येथे अगदी चपखल बसला आहे! :)
अजून एक-
आज मटा, लोकसत्तासारख्या प्रमुख वृत्तपत्रांच्या पुरवण्यात इंग्रजी शब्दांची अगदी रेलचेल असते. मनोगतावर शब्दसाधनेचा पाठपुरावा करणाऱ्यांनी या विरोधात काही भाषिक चळवळ प्रखरतेने चालवली असेल तर त्या विषयी नक्कीच उत्सुकता आहे! संबंधित वृत्तपत्राच्या संपादकांना/मालकांना जर याबाबत काही निषेधपत्र पाठवली गेली असतील तर त्या पत्रांविषयीही जाणून घ्यायला आवडेल.
राहता राहिला मनोगताचा प्रश्न! संगणक/आंतरजाल संबंधित आम मराठी माणासांमधून खरोखरच ज्यांना मराठीत लिहायची, वाचायची आवड व इच्छा आहे आहे अश्याच मंडळींनी येथील सभासदत्व घेतले आहे. अफाट पसरलेल्या आंतरजालीय विश्वात मनोगत, मायबोली, उपक्रम, माझे शब्द यांसारख्या संकेतस्थळांवर सभासदत्व घेऊन या मंडळीचे मराठी भाषेविषयीचे प्रेम आधीच सिद्ध झाले आहे.त्यामुळे या मंडळींना शब्दसाधनेचे धडे देऊन काही फारसा/वेगळा उपयोग होईल, असे व्यक्तिश: मला तरी वाटत नाही!
प्रश्न आहे तो ग्राउंड लेव्हलला उतरून काम करण्याचा. "मटाच्या पुरवणीतले अनावश्यक इंग्रजी शब्द बंद करा" अशी चळवळ टाईमस ऑफ इंडिया कार्यालयाच्या दारात उभारण्याचा!
माधवी.
'ग्राउंडलेव्हल' या शब्दाकरता चपखल मराठी शब्द मला सुचला नाही. क्षमस्व!