रेशमी एग्झिबिशनिज्म म्हणजे नेमके काय ते कळाले नाही, पण कोणत्याही दोन कवींची तुलना करणे योग्य नाही असे मला वाटते. गुलजारची संवेदनाशीलता त्याच्या चित्रपटांमधूनही दिसते. विशेषत: मिर्झा गालिब सारखी मालिका इतर किती दिग्दर्शकांना जमली असती हा चर्चेचा विषय ठरावा. वर म्हटल्याप्रमाणे गालिबसारखे देव लोक सोडल्यास इतर बर्याच कलाकारांप्रमाणे गुलजारच्या काव्यातही चढ-उतार दिसून येतात. आता त्यातल्या चांगल्या कविता वाचायच्या की साधारण हे ज्याचे त्याने ठरवावे.
हॅम्लेट