शुद्धिचिकित्सकाचा उपयोग तुम्ही करू लागला आहात ही चांगली गोष्ट आहे; मात्र तपासणीचे/सुधारणेचे काम झाले की तेथून मजकूर येथे कॉपी न करता, चिकित्सकाच्या खिडकीच्या तळव्यात तपासणीचे काम 'झाले' हे जे बटण आहे त्यावर टिचकी मारलीत की तो मजकूर मूळ खिडकीत उतरवला जातो. आणि तसे होताना तपासणीसाठी लागणाऱ्या खुणा काढून टाकल्या जातात (उदा वरच्या मजकूरातला 'स्वतःहून' ह्याच्या निळा पार्श्वरंग पाहा. तो आणि इतर अनेक अदृश्य खुणा तशाच राहून गेलेल्या आहेत.)