सुनील, तुमच्या बव्हंशी मतांशी मी सहमत आहे. तुम्ही परिस्थितीचे यथातथ्य वर्णन केलेले आहे. मुलींना जग पाहण्याची संधी मिळुनही त्या मुलांच्याप्रमाणे गांभीर्याने ती संधी वापरत नाहीत असे आढळून आले आहे. त्यामुळे तडजोडीचे निकष त्या वास्तव ठेवू शकत नाहीत. म्हणून तुम्ही केलेले निरीक्षण पदरी पडते.
असो. पण तुमच्या लिखाणात होतकरू मुलामुलींनी काय काय उपाययोजना करायला हवी ह्याबाबत थोडेसे मार्गदर्शन करायला हवे होते. असे मला वाटते. तुमचे ताजे ताजे अनुभवसार जरा इथे उपलब्ध करून द्यावे ही विनंती.