मुली बहुधा असे म्हणत असाव्यात, वाचून त्यात काही अतिशयोक्ती आहे असे वाटले नाही, आपण पुरुष असल्याने कदाचित मुलींबद्दल आपल्याला असे अनुभव आलेले असावेत पण यावर आपण उपाय सुचवू शकाल का?

म्हणजे मुलींनी किती शिक्षण घ्यावे, त्यांनी कोणकोणत्या तडजोडी कराव्यात, त्यांच्या आईवडिलांनी त्यांना मोठे करताना काय काय शिकवावे, शाळेत त्यांनी पैसा आणि छानछोकीला अधिक महत्त्व देऊ नये म्हणून विशेष तास घेतले जावेत का?, मुलींची मानसिकता कशी घडवावी, तरीही त्या तयार नसतील तर कोणकोणते उपाय योजावेत?, मुलींच्या निर्णयात आई आणि मैत्रिणींचा सहभाग जाऊन वडिल, भाऊ आणि मित्र यांचा सहभाग येण्यासाठी काय करावे लागेल? सध्याच्या फ्लॅट संस्कृती जगात व्यक्तीचा स्वभाव, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि वागण्याची पद्धत (म्हणजे मुलामुलीला बघायला गेल्यावर, घरावर एक नजर फिरवल्यावर दर्शनी नाही) चटकन कळावी यासाठी काय उपाय योजता येतील?

अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला मला नक्की आवडतील. त्यावरून मुलींना (मुलांनाही) कसे वाढवायचे याचा अंदाज पालकांना येऊ शकेल.