आपण आपले अनुभव जसे आले तसे मांडले आहेत त्यामुळे कोण्त्याच मनोगतीला राग यायचे कारण आहे असे वाटत नाही.
यावर बऱ्याच ठिकाणी विचारमंथन झाले आहे.विठ्ठल प्रभूंसारख्या लैंगिक विषयातील तज्ञानीही असे मत व्यक्त केले आहे की लग्न झाले नाही तर मिळवत्या स्त्रीचे काही अडत नाही आणि त्यामुळे तिला विशिष्ट प्रकारचा जोडीदार निळाला तरच लग्न करेन असा ती आग्रह धरू शकते आणि तसे झाले नाही तर अविवाहित राहून सुखाने जीवन व्यतीत करू शकते.कितीही तरुण वयात पतीचे निधन झाले तरी अविवाहित रहाणाऱ्या स्त्रियांची संख्या तशाच प्रकारच्या पुरुषाहून कितीतरी अधिक असते त्याचेही तेच कारण आहे. स्त्री एवढी स्वयंपूर्ण असते की स्वत: चे मूल पुरुषाच्या मदतीशिवाय स्वतः जन्माला घालू शकते फक्त ते मूल स्त्रीच असते एवढीच काय ती त्रुटी यात असते. (नलिका बालक असेल तर तो मुलगाही असू शकतो), आता तर स्त्री बालक किंवा गर्भ हत्या यामुळे हा प्रश्न आणखीच अवघड होण्याची शक्यता वाटते.
मात्र ज्या स्त्रीला लग्न व्हावे अशी इच्छा असते तिने सर्व बाबतीत आपल्यावरचढच पती हवा असा आग्रह धरायचे कारण नाही.