सर्वप्रथम अभिनंदन .
माझा स्वतःचे लग्नसमयी व धाकट्या भावाचे वेळी देखील असाच कटु अनुभव आला आहे.
मुलाची बाजूच फक्त अन्यायकारक वागते आणि मुलीकडील बिचारे (?) गरीब असाच सर्वत्र प्रवाद/ मत आहे.
माझ्या बाबत तर वाग़नि:शय तारीख ठरवून निव्वळ दोन भावंडे व आई ची जबाबदारी आहे या कारणाने यंदा योग नाही असा पवित्रा अनुभवला आहे. (माझी संपूर्ण व्यक्तिगत माहिती वधूवर सूचक मंडळाकडून घेऊन आलेल्या उच्चशिक्षित घराचा आलेला अनुभव आहे)
मी व्यक्तिगत माहिती मध्ये वडील हयात नसून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझेवर आहे असा स्पष्ट उल्लेख असूनही असा अनुभव आल्यामुळे आईला फारच मनस्ताप झाला. या संपूर्ण प्रकारात मुलीच्या आई ची माझे स्वतंत्र घर असावे आशी इच्छा होती आसे कळले.
हीच बाब सुरवातीस कळली असती तर बरे झाले असते. विशेष म्हणजे अपवादात्मक स्थळा वगळता मुलाचे उत्पन्न आणि स्वतंत्रता याचाच विचार दिसला
ह्या विचारांशी इतरांनी सहमत असावे अशी अपेक्षा नाही व कुणाच्या भावना दुखावण्याच हेतू नाही. हि विनंती. पाहिलाच प्रतिसाद असल्याने कृपया समजून घ्यावे
yaa