मनोगतावर शब्दसाधनेचा पाठपुरावा करणाऱ्यांनी या विरोधात काही भाषिक चळवळ प्रखरतेने चालवली असेल तर त्या विषयी नक्कीच उत्सुकता आहे!
हो आपले म्हणणे खरे आहे. ही चळवळ सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावी असाच माझा विचार आणि प्रयत्न आहे. थोडेफार आम्ही कमी पडत आहे याची मला जाणीव आहे. एकदा का ही लोकचळवळ झाली की वर्तमानपत्रे अथवा इतर माध्यमे शुद्ध मराठीचा वापर करतील याबद्दल मला खात्री आहे.
मराठी भाषेविषयीचे प्रेम आधीच सिद्ध झाले आहे.त्यामुळे या मंडळींना शब्दसाधनेचे धडे देऊन काही फारसा/वेगळा उपयोग होईल, असे व्यक्तिशः: मला तरी वाटत नाही!
आपले हेही मत मला मान्य आहे. यापुढे मी शब्दसाधनेच्या बद्दल उदा. शब्द साधना -१७, मनोगतवर लिहिणार नाही. शेवटी आपण आपले दैनंदिन व्यवहार सांभाळून मनोगत वर येतो आणि आस्वाद, विचार संक्रमण करत असतो. या लेखाचा उपयोग नाही असे आपल्या सारख्या विदुषीच्या विचाराशी सहमत होण्याचा मला तरी वेगळा मार्ग दिसत नाही.
आता अवांतर, ही चळवळ आणखी व्यापक करण्याचा मानस आहे आणि याबद्दल योग्य वेळ आणि संधी येताच त्याचे प्रकटन निश्चितच केले जाईल. आणि हो, यात आपलाही सहभाग मागितला जाईलच. शेवटी मराठा तितुका मेळवावा हे कसे विसरता येईल?