म्हणजे मुलींनी किती शिक्षण घ्यावे, त्यांनी कोणकोणत्या तडजोडी कराव्यात, त्यांच्या आईवडिलांनी त्यांना मोठे करताना काय काय शिकवावे, शाळेत त्यांनी पैसा आणि छानछोकीला अधिक महत्त्व देऊ नये म्हणून विशेष तास घेतले जावेत का?, मुलींची मानसिकता कशी घडवावी, तरीही त्या तयार नसतील तर कोणकोणते उपाय योजावेत?, मुलींच्या निर्णयात आई आणि मैत्रिणींचा सहभाग जाऊन वडिल, भाऊ आणि मित्र यांचा सहभाग येण्यासाठी काय करावे लागेल? सध्याच्या फ्लॅट संस्कृती जगात व्यक्तीचा स्वभाव, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि वागण्याची पद्धत (म्हणजे मुलामुलीला बघायला गेल्यावर, घरावर एक नजर फिरवल्यावर दर्शनी नाही) चटकन कळावी यासाठी काय उपाय योजता येतील?
मी फक्त माझे निरीक्षण लिहीले आहे. बरोबरच आहे असे कुठेही लिहिलेले नाही. लग्न ठरविण्यामध्ये मुलगी, तिचे वडिल, भाऊ यांच्या मतापेक्षा तिच्या आईचे मत जास्त परिणामकारक असते हे जाणवलेले आहे. जर वर लिहिलेले एवढ सगळं मुलींना सांगावे लागणार असेल तर.. (?) आणि तरीही त्या तयार नसतील तर ह्यातून काय सुचवायचे आहे? म्हणजे शेवटी त्यांचा हट्टीपणाच म्हणायचा. दर्शनी भेटीत सखोल कळत नाही हे मान्य. पण भेटण्याअगोदर माहिती निश्चितच घेतलेली असते. मग नंतर घोळ का घालयचा? तसेच १-२ भेटीमध्ये व्यक्तिचा साधारण अंदाज येतोच. नाहितर प्रेमविवाह झाला पहिजे.
मी लेखाच्या सुरवतीलाच म्हटले आहे की ठरवून करायच्या विवाहाबद्दल लिहीतोय. त्यामुळे ह्या पद्दतीमध्ये १-२ भेटीतच सारासार विचार करून निर्णय घ्यावा लागतो.
माझे म्हणणे एवढेच आहे की मुलांनी/मुलींनी सारासार विचार करून निर्णय घ्यावा. केवळ १-२ गोष्टी वर अवलंबून निर्णय घेऊ नयेत.