मुलांच्या अपेक्षा दोनच (वरच्या उदाहरणाप्रमाणे..) असतात कारण बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी बायको या टायटलखाली गृहित धरलेल्या असतात. 'नवरा' ह्या भूमिकेचे पारंपारीक चित्रण मूळातून बदलण्याची गरज बायकांना वाटते कारण पारंपारीक वैशिष्ठ्यांमधल्या अनेक गोष्टी स्त्रीला जाचक होत्या. पण 'बायको' ची पारंपारीक प्रतिमा मूळातून बदलण्याची गरज मुलांना वाटत नाही कारण ते त्यांच्या सोयीचे असते. त्यामुळे अपेक्षांची यादी सकृतदर्शनी लहान दिसणारच.