माझी एक मैत्रिण चांगली गोरीगोमटी, दिसायला सुंदर आणि उच्चशिक्षित, नोकरी करणारी. मात्र उंची पाच फुटांपेक्षा कमी. ती एका मुलाला बघायला गेली. त्यावेळी मुलगा बाहेरगावी गेला होता, मुलाचे पालक तेवढे घरी होते. मुलाची आई माझ्या मैत्रिणीपेक्षा बुटकी तर मुलाचे वडील जेमतेम पाच फुट उंचीचे होते. मुलगा पाच दोन होता. इतर सगळे उत्तम असून त्यान्नि तिला कमी उंचीमुळे नाकारली. का? तर त्यान्ना पाच फुटांपेक्षा जास्त उंचीची मुलगी हवी होती. हट्टी सगळेच असतात.