मराठी शब्द शोधणे, वापरणे व त्याचा जनमानसात प्रसार करणे हे कार्य अवघड आहे. ते आपण करण्याची तयारी दाखवली आहे आणि त्याला साधना म्हटले आहे. तेव्हा आता माघार घेणे नाही.

मनोगतावर मराठी प्रेमी आहेत किंवा नाहीत याचा आपले लेखन इथे प्रकाशित करण्याची फारसा संबंध नसावा. कारण आपल्याला परिणामांची चिंता नाही. 

आपले स्नेही, नातेवाईक, राहता तेथील शेजारी,आजुबाजूच्या शाळा, महाविद्यालये येथील भित्तीपत्रके यावर संबंधित अधिकारी व्यक्तींना भेटून जर आपली शब्दसाधने मागची भूमिका समजावून सांगितली तर आपल्याला तेथेही लेखी स्वरूपात आपले पत्रक लावता येईल.

लोकांनी शब्द संस्कृतोद्भव शब्द घ्यायचे की भारतातील कित्येक बोलीभाषांमधील, इंग्रजीतील की हिंदीतील अथवा इतर प्रांतीय भाषेतील शब्दांना मराठमोळे करून ते वापरायचे ह्यावर दुमत असू शकेल पण शब्दांचे मराठीकरण करूच नये हा पर्याय अमान्य असू नये. मराठीतील प्रचलीत इंग्रजी अथवा परभाषिक शब्द आणि त्याचे आपल्याला मिळालेले, सुचलेले, पटलेले प्रतिशब्द यांचा एक तक्ता तयार करता येईल.  आपले स्नेही अथवा मनोगतासारख्या मराठी विषयी जागरूक असणाऱ्या गटाकडून प्रतिशब्द मिळवणे, अशाच प्रकारे जागरूक राहून आपल्या संपर्कातील व्यक्तींना कोणता प्रतिशब्द अधिक योग्य वाटतो यावर मत घेणे आवश्यक आहे.  ह्याचा अवलंब जेवढा व्यापक प्रमाणात तेवढे यश जास्त. विविध वयोगटातील, विविध कार्यक्षेत्रातील लोकांकडून  ज्या प्रतिशब्द पर्यायाला जास्त मते मिळतील तो शब्द रूढ होणे सोपे होईल.

राहत्या जागेतील सभासदांना दिसेल अशा ठिकाणी व संपर्कातील पाच व्यक्तींना मराठी प्रतिशब्दावर मत मागण्याकरता शब्दासाधना १३ उतरवून घेतले आहेत.

मिळालेली उत्तरे/ मते येथे लिहिण्याचा विचार आहे. अशाच प्रकारे अनेक मनोगती त्यांना शक्य होईल त्यानुसार सहभागी होतील याची खात्री आहे.

शब्दसाधना १७ ची वाट बघत आहे.