तुम्ही जे काही तुमचे अनुभव लिहीले ते मलातरी पटलेले नाहीत.

मुलींना लग्नानंतर वेगळे रहावेसे वटले त्यात त्यांचे काय चुकले? त्यानी सासु-सासऱ्यांची  जबाबदारी नको असे त्यांन वाटले तर काय बिघडले?  कुठलाही मुलगा बायकोच्या आई-वडिलांची जबाबदारी घ्यायला तयार नसतो.मी तर असे उदाहरण पाहिले आहे की मुलगी चांगली शिकलेली होती, दीसायलाही चांगली होती पण तीला भाऊ नव्हता म्हणुन तीला नाकारले कारण नंतर तीच्या आईची जबाबदारी आपल्यावर येईल.

जर मुले लग्नानंतर एकत्र रहायची अट घालतात,  प्रत्येक मुलाला आपल्या आई-वडिलांबरोबर रहावेसे वाटते तर  मुलीला माहेर सासरच्याच गावात हवे असे वाटले तर त्यात तीचे काय चुकले.  

मुलगी २७-२८ वर्षांची झाली तर ती थोराड/जून दिसायला लागते. मुले तिला नाकारतात. कारण मुलगी लहान व नाजुक असावी अशी मुलांची अपेक्षा असते. म्हणजेच मुलेही तडजोडीला तयार नसतातच ना?