"एक तर थोराड / जून वगैरे शब्द जबरदस्त खटकले. (म्हणजे काय भाजीची गड्डी आहे काय?) दुसरे म्हणजे, "मुलगी लहान व नाजूक असावी" ही मुलांची (तथाकथित) अपेक्षाच मुळात आपल्याला कितपत रास्त वाटते? मुलगी लहान आणि नाजूक का असावी? लहान आणि नाजूक असली, की तिला जगाचा अनुभव / अक्कल* आलेली नसते म्हणून? (इथे अक्कल हा शब्द कोणत्याही derogatory अर्थाने वापरलेला नाही. नुकत्याच कॉलेजातून बाहेर पडण्याच्या वयात किंवा अगदी कॉलेजातून बाहेर पडून नोकरी करून एकदोन वर्षे झाल्यावरसुद्धा, मुलगा किंवा मुलगी दोघांनाही, स्वतःला कितीही वाटले तरी, पुरेशी अक्कल आलेली नसते, हे सद्य लेखकाचे ठाम मत आहे. सद्य लेखकालाही नव्हती, हेही तो इथे नमूद करू इच्छितो.) आणि मग अशा परिस्थितीत ती आपले काय वाटेल ते ऐकून घेईल म्हणून?"
या आपल्या विधानाशी १००% सहमत!