वर्षांनो वर्ष दलितांची परवड, ससेहोलपट चालली आहे, हे मान्य. आणि समाज प्रबोधन खऱ्या अर्थाने झाल्याशिवाय ह्यांतून त्यांची सुटका नाही, हेही मान्य.
पण आपल्या काही विधानांमध्ये काही गफलती आहेत.
मछिंद्र कांबळी 'कांबळे' संबोधल्यानंतर भडकतात, त्यावरून आपण त्या त्यांच्या भडकण्याचा संबंध दलितांशी लावला आहे, तो लेखाला चटकदार सुरुवात करण्यापुरता असला, तर ठीक. पण वास्तवात हे अनुमान खूपच ओढूनताणून आणल्यासारखं वाटतं. कारण आपल्या स्वतःच्या नावाचा कशाही प्रकारे गैर उच्चार केला गेला की एखाद्या व्यक्तीला ते खटकणे साहजिक आहे. त्याचा दलित-दलितेतर असा संबंध लावण्यासाठी अजूनही काही तपशिलाची आवश्यकता आहे. आणि असं पाहा, कांबळींना अगदी तुम्ही म्हणता तसा अर्थ मनापासून जरी अभिप्रेत असला, तरी नाटकामध्ये तसं दाखवणं राजकीय व त्याहीपेक्षा आर्थिकदृष्ट्या त्यांना परवडेल काय? कारण असं उघडपणे करताना त्यांना अनेक मराठी दलितांचा रोष ओढवून घ्यावा लागेल.बाकीच सगळं जाऊदे, असं करणं त्यांच्या धंद्याच्या दृष्टीने त्यांना अजिबात परवडणारं नाही.
दुसरा मुद्दा निवडणूकीत दलितांना वेगळं का धरलं जातं हा. त्याला कारण दलितच आहेत. जेव्हा एखादा समूह स्वतःचा वेगळा पक्ष उभारतो, व त्याप्रमाणे मतदान करत असताना दिसतो, तेव्हा इतर पक्षांनी हे त्यांच्या गणितात पकडलं तर बिघडलं कुठे?
'मराठी माणूस म्हणजे नेमका कोण त्यात मराठी दलित पण आला की नाही ते कळत नाही'
का कळत नाही? तश्या अर्थाचं काही वक्तव्य अथवा वागणूक शिवसेनेकडून झाल्याची आढलली का आपल्याला?
....प्रदीप