प्रियाली,

हिंसाचार हे उत्तर असू शकेल का? मी तरी म्हणेन की नाही, नाही, नाही. खारं तर त्या लढ्याची मोठी जीत हीच आहे की, सर्वस्वाचा होम करुन त्या मंडळीनी अहिंसाच जपली. गांधीनीही त्यांना खचितच सलाम ठोकला असता. हाती काहीही नसताना केवळ आत्मिक सामर्थ्यावर एकादी गोष्ट जीवापाड जपायची हे सोपं नसतंच. रेहमलचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाल्यानंतरही किंवा त्या गोळीबाराचा निषेध करण्यासाठी काढलेल्या मोर्चावर पोलिसानीच केलेल्या अमानूष लाठीहल्ल्यानंतरही त्यांनी ती जपलीय याला कितीही सलाम केले तरी ते कमीच ठरतील.

तरीही हा प्रश्न मी का विचारला असेल? वीस वर्षांच्या या लढ्यात त्या भागात हिंसाचार आदिवासींच्या बाजूनं घडलेला नाही. डोळ्यांसमोर सर्वस्व संपत असतानाही ही अहिंसा त्यांनी कशी जपली असावी? या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्याचा तो एक प्रयत्न आहे.