मला वाटतं की, विकी साहेबांनी केवळ एक विषय घ्यायचा आणि त्यावर उगाचच गदारोळ घालायचा या एकमेव हेतुने ही चर्चा सुरू केलीय.

कांबळींचा तो विनोद, मराठी दलित विरूद्ध मराठी माणूस, हे मुद्दे अतिशय हास्यास्पद आहेत. किंबहुना हे मुद्दे नाहीतच. मला नाही वाटत कि, दलित मराठी माणूस म्हणून दलित माणसांची परप्रांतीयांविषयी (सामान्य / इतर मराठी माणसापेक्षा) काही वेगळी भावना असेल. कारण सर्वच मराठी मंडळींची विविध बाबतीत (नोकरी / धंदा/ व्यवसाय / जागा) या परप्रांतीयांनी आक्रमण करून पंचाईत केलेली आहे.

त्यामुळे असे मुद्दे काढून आपण नवीन वाद  निर्माण करत आहात. वेगळा (आणि किंचित विकृत ) असा विचार मांडून बुद्धीभेद निर्माण करत आहात असे वाटते.

प्रसाद