(इंग्रजी शब्दांच्या अतिवापराचा मला राग यायचा बंद झाला आहे.)

काल "मी मराठी" असं म्हणविणाऱ्या वाहिनीवरील बातम्यांच्या लिहिलेल्या मथळ्यांत, फक्त दहा मिनिटांच्या अवधीत, "पूणे", "पून्हा", "अबांदास" (अंबादास), "बूद्धीवान", वगैरे अक्षम्य "चूका" आढळल्या. 

अहो, फार काय, श्रीनांच्या ताज्या पुस्तकातही शुद्धलेखनाच्या (बहुदा तपासनिकाने लादलेल्या) अमाप "चूका" आहेत.

हा रेटा जोरदार आहे. फक्त इंग्रजी माध्यमातच शिकलेल्या आणि मराठी दुय्यम भाषा म्हणून अभ्यासलेल्या पीढ्या बाहेर पडायला लागल्या, की अशीच सिच्युएशन क्रिएट होणार. तयार असा.

- कोंबडी