आपले उत्पन्न कमी असताना जास्त उत्पन्न असलेल्या अशा वधूबरोबर लग्न करताना
अशी अनेक उदाहरणे माझ्या आजुबाजुला घडली आहेत. त्यातले एखादेच विभक्ततेच्या मार्गाने गेले. बाकी संसार चांगले सुरू आहेत असे दिसते. यातही मुख्य मुद्दा पत्नीचे काम जास्त आव्हानात्मक असल्याने, ती रात्री घरी उशीरा येणार, तिला कामानिमित्त देशापरदेशात जावे लागणार या गोष्टी स्विकारल्या तर जमते असाच वाटला.
समंजसपणे घेतले तर वस्तुतः यात न जमण्यासारखे काहीच नाही. माझा प्रतिप्रश्न हा प्रस्तुत लेख ज्या मानसिकतेतून लिहिला गेला आहे असे वाटले त्या मानसिकतेला उद्देशून होता.
- टग्या.