संपुर्ण ट्रेक मध्ये उन्हाने होरपळून निघालो हे जरी खरे असले तरी, निर्मळ झऱ्याचे दर्शन होताच डोळे सुखावले तो क्षण अजुनही मनात तसाच आहे. रणरणत्या उन्हातुन धापा टाकत गडावर पोचावे, अन डेरेदार वृक्षांच्या सावली, झुळूझुळू वाहणाऱ्या झरा, प्रसन्न करणारा रानफुलांचा सुगंध - सुखाच्या कल्पना किती पद्धतीने पुर्ण कराव्यात आणि एखाद्यावर किती उपकार करावेत हे या रांगड्या डोंगरकड्याकडुन शिकावे. मागच्या सर्व गोष्टी विसरुन पुढच्या अनेक दिवसांमधे सोबत करतात या सगळ्या आठवणी, सुंदर ट्रेक, नेहमीसारखाच अविस्मरणीय अनुभव...