परत एकदा प्रतिसाद लिहित आहे. टग्या, सर्वसाक्षी, कोंबडी यांचे प्रतिसाद तर दाखले आहेतच आणि एक टग्या यांचा मुद्दा बरोबर आहे की केवळ इंग्रजी माध्यमातून शिक्षण होत आहे त्या मुळे ही परिस्थिती नाही आली आहे, माझे माध्यमिक (६ वी ते १० वी) शिक्षण मुळातच दिल्लीच्या सीबीएसई मध्ये अमराठी मुलां बरोबर झाले. परत मुंबईला महाविद्यालयीन शिक्षणासाठी आलो तर माझ्या बऱ्याच मित्र मैत्रणीं चे मराठी बोलण्याची तऱ्हा (मराठी माध्यामातून शिकलेल्या) अशी आगळीक (आंग्लाळलेली) होती आणि अजून आहे.

मटा चे एक सदर असते ह्या नावाचे "मटा दणका". आपण मनोगती काय करू शकतो ह्या मटालाच दणका देण्या साठी???? आणि "मागणी तसा पुरवठा" कसला???? आम्हाला स्पष्ट, शुद्ध मराठीच हवी आहे.