ह्या चर्चेत भाग घेतलेल्या सर्व मनोगतींचे मनापासून आभार मानतो!
सर्वांनी मनमोकळेपणाने दिलेल्या प्रतिसादातून काळानुरूप कसे बदलले पाहिजे हे प्रकर्षाने कळून येते.
असो. माझे काही मित्र लग्नाळू आहेत. त्यांच्याशी गप्पागोष्टी करताना मला काही एकांगी (जे मी माझ्या लेखात मांडले) तर काही वास्तव मते ऐकायला मिळाली. ही चर्चा मी माझ्या कंपनीत केली. त्यावरून ह्याच विषयावर एक छोटे नाटक बसवायचे ठरले.
आम्हाला काही नैसर्गीक संवादाची आवश्यकता होती. ह्यामुळेच मी हा विषय मनोगतवर आणला. मनोगतवरील चर्चा मला नेहमीच आवडतात कारण त्या जास्त नैसर्गीक / उत्स्फूर्त असतात. म्हणून आमच्या नाटकासाठी काही संवाद/टिपण (पॉइंटस) इथे मिळतील ह्याची मला खात्री होती. तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रियातून मला चांगली माहिती मिळाली.
माझ्या लेखामुळे कुणाची मने जर प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरित्या दुखावली गेली असतील तर कृपया विसरून जावे.
(जर आमच्या नाटकाला बक्षीस मिळाले तर त्यात मनोगतचापण वाटा असेल.:))