शब्द साधने च्या भूमिका मांडताना अनेक मते आली आणि त्यांचा परामर्ष घेणे किंवा त्यांना उत्तरे देणे थोडे थोडी सवड नसल्यामुळे अवघड झाले.
शब्द साधना हा माझ्या असलेल्या कुवतीप्रमाणे केलेला विचार आहे आणि त्यात काही न्युनता असणे अपेक्षित आहे.
याच अनुषंगाने माझ्या मनात काही गोष्टी घोळत असतात. त्या खालील प्रमाणे,
शब्द साधना हे ठराविक काळासाठी घेण्याचे औषध आहे. त्यामुळे शब्दसाधना हा विरंगुळा वगैरे नसून परकीय शब्द हाकलण्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे. (थोडे) परकीय शब्द लोकव्यवहारात राहतील परंतु त्याचे सध्याचे स्तोम राहता कामा नये. कोणताही अतिरेक वाईट. आपल्या मनात / लोकात एकदा परकीय शब्द स्वीकारण्याची सवय कमी झाली की आपोआपच मराठीचे सामर्थ्य टिकून राहील हाच उद्येश आणि भूमिका आहे. पाच / दहा परकीय लोकव्यवहारात राहिले तर काही घडेल असे मलाही वाटत नाही.
मनोगत ही आपली प्रयोगशाळा आहे आणि शब्दसाधना हे सदर चालवताना आपणास सुदैवाने बऱ्यापैकी यश मिळाले आहे हे नक्कीच. आता इतरत्र काही प्रमाणात थोडी मुसंडी मारण्याची गरज आहे आणि ते घडेल अशी मला अपेक्षा आहे.
कृतीप्रवण आणि नवनवीन प्रयोग करत राहणे हाच आपल्या जीवनाचा अर्थ आहे आणि तेच तत्त्व आपण मराठीच्या स्वरक्षण, संवर्धन आणि संगोपनासाठी वापरत आहो इतकेच.
द्वारकानाथ