नमस्कार,

येथे इतक्या संख्येने आणि इतके मोठे प्रतिसाद आहेत याची कल्पनाच नव्हती. वाचता वाचता पार दमछाक झाली :)

परंतु एक सूर असा जाणवला की मराठी विज्ञान भाषा होणे यामध्ये अनेक अडचणी आहेत अथवा त्याची गरज नाही.
मी जर्मनी मध्ये आल्यावर मी असे पहिले की येथे स्थानिक सर्व लोक जर्मन भाषेतूनच विज्ञान शिकतात आणि बोलतात. पिएचडी ची परीक्षा सुद्धा ते त्यांच्या भाषेतून देवु शकतात. इतकेच काय तर त्यानंतरच्या शात्रज्ञाच्या नोकरीसाठीचे सादरीकरण सुद्धा ते जर्मनमधून करतात/ करु शकतात. हे पाहिल्यावर मला तर मराठी ही विज्ञानभाषा करता येवु शकते या बद्दल संदेह राहिला नाही.
इंग्रजी विश्व-भाषा आहे आणि त्यामुळे इथले लोक त्या भाषेचा वापर सुद्धा लिलया करतातच. पण मूळ शिक्षण मातृभाषेतून झालेले असल्याने त्याचे अनेक फायदे त्यांना मिळाले असतील असेच वाटते.

मराठीमध्ये विज्ञान-तंत्रज्ञानासाठी अनेक नवे शब्द बनावेत, ते लोकांपर्यंत जाणीवपूर्वक पोहोचवावेत आणि त्यांना ते शब्द वापरण्यासाठी उद्युक्त करावे असे मला मनापासून वाट्ते.

--लिखाळ.