कुणी कुठल्या चर्चेला सुरुवात करावी, ह्याबद्दल काही नियम नाहीत, आणि तसे ते नसावेत. परंतु एखाद्या विषयावर चर्चा सुरू करताना लेखक जेव्हा काही मुद्दे मांडतो, तेव्हा किमानपक्षी त्याला स्वतःला ते मुद्दे पटलेले आहेत, आणि त्याने त्यावर नीट विचार केलेला आहे, अशी वाचकांची रास्त अपेक्षा असते. इथे विकींनी जे मुद्दे मांडले, त्यांचा मी शक्या तितक्या सौम्य शब्दांत परामर्ष घेतला. त्यावर विकींनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. प्रसादांनी स्पष्ट शब्दांत विकींच्या मुद्द्यांची संभावना 'हास्यास्पद' अशी केल्यावरही विकींना त्या मुद्द्यांच्या समर्थनार्थ काही सांगता आलेले नाही. उलट 'आजूबाजूला बघा, म्हणजे समजेल' अशी थोडीशी पोकळ मल्लीनाथी करून त्यांनी वेळ मारून नेली. तेव्हा आपल्या स्वतःच्या मुद्द्यांवर त्यांचा स्वतःचाच फारसा विश्वास नसावा, हे उघड आहे. म्हणूनच ही चर्चा चालू करण्यामागे 'देऊ एक खमंग पुडी सोडून, आणि मग बघू काय मजा येते ती' असा हेतू होता की काय अशी शंका येते.