चक्रपाणि,
या विषयाला नक्कीच अनेक अंगे आहेत आणि या गोष्टी जनमामसात रुजणे, त्या वापरात येणे आणि मग त्याचे प्रत्यक्ष फायदे तोटे समजणे याला बराच मोठा काळ लागणार. परंतु हे व्हावे हे आपल्या सर्वांनाच वाटते हे पाहून आनंद वाटतो. बरेच वेळा मला दोन इंग्रजी म्हणींची आठवण येते.
'मच थिंकिंग ब्लंटस ऍक्शन' आणि 'ऍनॅलिसिस मेक्स पॅरलिसिस'   

जे लोक उत्साहाने करत आहेत त्यांना पाठिंबा आणि जमेल तेवढे सहकार्य मी माझ्या कडून द्यायला तयार आहे.

तांत्रिक पारिभाषिक शब्द बऱ्याच प्रमाणात सारखे असावेत असे वाटते.

विनायक काका,
आपण म्हणता तो मुद्दा सुद्धा विचार करण्यासारखा आहे. मला जर्मन येत नाही. पण येथे वावरताना आणि वैज्ञानिकांची सादरिकरणे पाहताना मला जे जाणवले आहे ते मी सांगतो.

विनायक काका,आपण म्हणता तो मुद्दा सुद्धा विचार करण्यासारखा आहे. मला जर्मन येत नाही. पण येथे वावरताना आणि वैज्ञानिकांची सादरिकरणे पाहताना मला जे जाणवले आहे ते मी सांगतो.

मुळातच जर्मन भाषा हि इंग्रजीच्या जवळ आहे. अनेक शब्द त्यामुळे या भाषेत इंग्रजी आहेत अथवा त्यांचे जर्मनीकरण करवुन ते भाषेत सामावलेले आहेत. ( उदा. फोन करणे या साठी ते टेलेफोनिअरेन असे क्रियापद करतात. आनरुफेन असे जर्मन क्रियापद आहेच) परंतु जर्मन भाषेमध्ये अनेक दशके विज्ञान/तंत्रज्ञानाविशयी काम, संशोधन सुरु आहे हे आपण जाणतोच. त्यातील अनेक विषयांचा जन्म आणि/किंवा विकास येथे झाला आहे.त्यामुळे या लोकांकडे जुन्या काळापासुन अनेक पारिभाषीक शब्द जे इंग्रजीशी संबंधित नाहीत असे रूढ आहेत. जसे आपल्या कडे आयुर्वेदामध्ये पारिभाषिक शब्द आहेत की जे इंग्रजी शब्दाचे रूप नाही त्याच प्रमाणे यांचे स्वतःचे असे अनेकानेक शब्द, संज्ञा जर्मन मध्ये आहेत. त्यांचे प्रमाण किती असे विचाराल तर मला नक्की सांगता येणार नाही. पण ते जेव्हा शास्त्र विषय बोलतात तेव्हा आपण भारतिय भाषांमध्ये जे बोलू त्यापेक्षा कितीतरी नक्कीच जास्त शुद्ध जर्मन मध्ये ते सर्व विषय मांडतात. आपण भारतीय भाषेत बोलताना वाक्याचा साचा त्या भाषेप्रमाणे ठेवून त्यात इंग्रजी पारिभाषिक शब्दांची भरमार करतो तसे यांचे होताना दिसत नाही. शास्त्रज्ञ अनेकदा आपले संशोधन जर्ममध्ये सादर करतात. म्हणजे त्या भाषेची ती क्षमता नक्कीच आहे. पांघरलेले कातडे नक्कीच नाही.
मोठा शास्त्रज्ञ असो वा विद्यार्थी, ते एकमेकांशी त्यांच्या भाषेत शास्त्रविषय बोलतात. त्यांना या विषयी लाज वाटत नाही याची मला कमाल वाटते.

--लिखाळ.