जय महाराष्ट्र !
आपल्या पैकी किती जणांनी वरिल प्रतिसाद लिहीताना प्रशासकांनी लिहीलेले नियम पाळलेले आहेत. मला वाटत मी ते पाळलेले आहेत.
निनाद यांस सांगावेसे वाटते की माझे मतपरिवर्तन होण्याच्या प्रश्नच येत नाही.मतपरिवर्तन करायचेच असेल तर दुसऱ्यांचे करा. मी जे लिहीलेले आहे ती वस्तुस्थिती आहे.
या बाबत काही, माझा एक मित्र आहे त्याने असा शोध लावला की दलितांना(महाराष्ट्रातले बौद्ध) संस्कृती नाही . त्याला या विषयावरुन आम्ही त्याला खुप समजावयाचा प्रयत्न केला पण तो आपल्या विधानावर ठाम राहीला. काय बोलायचे ह्यांना. आणि मी तर बऱ्याच जणांच्य तोंडातुन ऐकले आहे की लग्न कोणाशीही करीन पण ह्या समाजातील पोरिंशी करणार नाही. असे बोलणाऱ्यांत परप्रांतियही होते आता या परप्रांतियांना असे सांगणारे कोण ? या विधानास हसावे की रडावे. बऱ्याच मराठी हौसिंग सोसायट्यांत तर दलितांना घर घ्यायचे असेल तर त्यांना प्रवेश नाही. बरिच आडनावे अशी आहेत की जी सवर्णांत पण आहेत आणि दलितांत पण आहे. ज्यांना ज्यांना हा लेख खटकला,हास्यास्पद,बाळबोध वाटला त्यांनी अशी आडनावे शोधुन त्यातील सवर्णांस विचारावे. आणि हो दलितांसाठी सर्वच सवर्ण मग ते ई.मा.व किंवा खुला प्रवर्ग असो. आणि यातिल दलित म्हणजे फक्त (महाराष्ट्रातले धर्मांतरित बौद्ध).
लिहीण्यासारखे बरेच काही आहे. पण जेवढा हा मुद्दा जेवढा खोलवर जाऊन मांडणार तेवढेच मनोगतावरिल काही बुद्धिमान त्याचा वेगळा अर्थ लावणार.
तेव्हा थोडा(बराच) विचार करा.
लेखातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण द्यावी अशी नम्र विनंती.
आपला
कॉ.विकि