बरे हे गोरे तंत्रज्ञही फार कांही वकूबाचे असत असे नाही. अगदी सुमार दर्जाची गोरी माणसे तिकडून इकडे पाठवली जात आणि केवळ गोरे आहेत म्हणून दादागिरीने वागत. आशियाई लोकांना तर ते अगदी कस्पटासमान वागणुक देत.
हे अगदी खरे आहे. अशा एका गोऱ्याच्या केबिनमध्ये पूर्वनियोजित वेळ न घेता घुसण्याचे धारिष्ट्य मी केले होते, पण नंतर तो माझा चांगला मित्र झाला होता, ते आठवले.
वामनला अनुभव नव्हता पण तो थोडा शांत स्वभावाचा होता. खरं म्हणजे वामन आणि गजानन चे जोडी छान जमली होती. पण ती जोडी तोडायची नाही तर मग महादूला स्टुअर्टकडे द्यावे लागले असते, आणि महादूने स्टुअर्ट बरोबर कोकणातले दशावतारी खेळ्ये केले असते.
वा, म्हणजे तांत्रिकी बाबींबरोबर मनुष्यबळ व्यवस्थापनातही आपण प्रवीण आहात म्हणायचे!
लेखन जिवंत आणि प्रवाही आहे. भाग वाचताना तो संपू नये असे वाटते!