काही दिवसांपूर्वी गडकरीला मच्छींद्र कांबळी यांचे 'भैय्या हातपाय पसरी हे नाटक पाहिले' आणि काही प्रश्न पडले.
का प्रश्न पडले तर अगोदरचा इतिहास आणि अन्याय अजून ही लक्षात आहे म्हणून की
सगळ्यांकडे बघण्याचा आणि ऐकण्याचा दुष्टिकोन तोच आहे म्हणून ?
स्वतःवर अन्याय होतो आहे हे सारख दाखवून किती वर्ष स्वतःची आणि स्वतःच्या
समाजाची फसवणूक करणार आहात ?
तो अन्याय कधी ब्राम्हणांनी नंतर मराठा समाजाने आणि आता तर तुमच म्हणणं
इतर मागासवर्गीयाने केला ? मग हे सर्व न जुमानता किती तरी दलितांनी ( स्वतःचाच )
विकास केलाच ना. तुमच्याच बरोबर इतर मागासवर्गीयांनी स्वतःचा आणि स्वतःच्या
समाजाचा विकास केलाच ना.
तुमच्या नविन प्रश्नांसाठी आत्मपरीक्षणाची गरज आहे.