म्हणूनच तर मी म्हणतोय की मराठी माणूस आणि दलित मराठी माणूस यात फरक आहे. मराठी संस्कृतीत दलित मराठी माणूस कसा बसतो ते स्पष्ट करा.
एका विनोदावरच तुम्ही जर मराठी माणूस आणि दलित मराठी माणूस वेगळा करत असाल तर तुमच्या मते मराठी माणूस आणि दलित मराठी माणूस किती वेगळा असेल आणि किती वेळा त्याच्यावर अन्याय झाला असेल ह्याची कल्पनाच न केलेली बरी. तुम्हीतर त्याला मराठी संस्कुतीतच बसवत नाही. का तर तो दलित आहे म्हणून इतर मराठी माणसानी त्यांना वेगळ केल म्हणुन.
तर माझा दुष्टीकोन तसा नाही एका मराठी माणसाने मराठी माणसाचे पाय खेचलेले काय कमी बघण्यास मिळतील( इतिहासात कारण आता ते परवडण्यासारखं नाही ).त्यासाठी हा भेद नको की एका मराठी माणसाने दलित मराठी माणसाला वेगळा केलं. मला हे मराठी आणि दलित मराठी वेगळं लिहायलाच लाज वाटते ( पण तुमच्यासाठी अस लिहितो आहे ) हा भेद करणं तर लांबाचीच गोष्ट.
म्हणून मला वाटत मराठी माणूस आणि दलित मराठी माणूस एकच आहे आणि मराठी संस्कुतिपासुन ही वेगळा नाही.