स्वतःवर अन्याय होतो आहे हे सारख दाखवून किती वर्ष स्वतःची आणि स्वतःच्या समाजाची फसवणूक करणार आहात ?
सवयीचा परिणाम !
आता सवयच झालेली आहे.... अन्याय झाला असा आरडा ओरडा करून सवलती ओरबाडण्याची.
भारताला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे होतील..... तरी आम्ही एका विशीष्ठ मानसिकतेतून बाहेर पडण्याची तयारीच दाखवत नाही. कोणी म्हणून दाखवावे; मला सर्व आरक्षण सुविधा मिळत असूनही मी घेणार नाही..... होईल असे कधी ?
"सिंगल पॉइंटेड अजेंडावर" (एककलमी कार्यक्रमावर) लक्ष केंद्रित केल्यास काय घडणार ?
म्हणूनच तर खाजगी क्षेत्रातही आरक्षणाचा पाठपूरावा करण्यास आता सुरुवात झाली आहे.
जागा भरल्या जात नाहीत म्हणून आरडा ओरडा करायचा.... पण हे लक्षात घ्यायची तयारीच नाही की, जागा भरण्यासाठी कमीत कमी पात्रता जी निश्चीत केली आहे त्याच्या जवळही आपण का फिरकू शकत नाही !
ह्याला अंत नाही हे आता सिद्ध झाले आहे.
पात्रता नाही म्हणून नोकरी मिळण्याची हमी नाही व नोकरी मिळत नाही म्हणून सवलती ओरबाडण्याची सवय अंगवळणी पडलीये.
हे तोपर्यंत चालेल जोवर अंगचे कलागुण दाखवल्यामुळेच उत्पन्न हाती पडेल.....
मग तो ब्राम्हण असो की मराठा की अनुसुचित जातीतला उमेदवार !
हे लक्षांत घ्या हा प्रतिसाद कुणा एका जातीच्या किंवा वर्गाच्या मंडळींसाठी नसून; आयते हातात पडण्याची अपेक्षा धरणाऱ्या व सवय पडलेल्या उच्च वर्गापासून ते कनिष्ठ वर्गातल्या प्रत्येक फुकट्या व्यक्तिसाठी आहे !