इथे आपणहून स्वानुभव सांगायला फारच कमीजण फिरकतील.  प्रेयसी हा बायकोच्या नेमका उलटा प्रकार आहे. बायको/ लग्नाबद्दल चांगले/वाईट जाहिर बोलायला अनेकजण सरसावतील आणि प्रेयसी/प्रेम म्हटले की 'अनुभव आहेत हो पण स्वानुभव फारसे नाहीत' सांगणारे जास्त.

बरं, आता सकाळचे ९ वाजले आहेत, बाहेर कधी नव्हे ते कोवळे ऊन पडले आहे आणि पक्षी चिवचिवाट करताहेत तेव्हा "नो वोडका मार्टिनी"

पाडगावकरांप्रमाणे  'तुमचं आमचं अगदी सेम असतं' अगदी खोटं नाही असं आपलं मला वाटतं. माणूस सर्वात जास्त प्रेम स्वतःवर करतो, आणि नंतर स्वतःवर प्रेम करणाऱ्यांवर, किंवा स्वतःवर  एखाद्या/दीने प्रेम करावे म्हणून त्या व्यक्तींवर. आता हे कबूल करायलाही फारजण पुढे येणार नाहीत. असो. आणि त्या प्रेमासारख्या चांगल्या शब्दाला लफडं का रे बाबा?   'प्यार को प्यार ही रहने दे, इसे लफडे का नाम ना दे।' (हे काव्यात्मक नाही धमकावणीच्या सुरात वाच.)

प्रेम काय कोणावरही करावं, कधीही करावं आणि कशावरही करावं. ६ वर्षाच्या अवखळ बालकाने करावं किंवा साठ वर्षांच्या केस पांढरे झालेल्या वृद्धाने करावे (उत्तम उदा. सुभाष घईंचा जॉगर्स पार्क) पण त्या प्रेमाचं लफड करायचं का हा ज्याचा त्याचा प्रश्न.

असो. फारच ज्ञानामृत पाजलं वाटतं, जाऊ दे, त्यापेक्षा वोडका-मार्टिनीच बरी.  

लेख मस्त आहे. सुरुवात म्हणजे पुढचा भागही आहे का? लवकर टाक.