नव्या माणसाने नटावे
घेऊन काही रंग नवे
नभी उडावे वैचित्र्याचे लाख थवे

वा,मुक्तछंदा! ह्या ओळी व ही नव्या रंगाची कविता आवडली. कल्पना,शब्द,अर्थ मिळून एक मस्त मिश्रण तयार झालं आहे!

ह्याचे त्याला त्याचे ह्याला सांगत जावे
एकाचे दोन कधी व्हावे
तर दोनाचे  चार करावे
अफवांच्या लाटेला नव्याने उधाण यावे
या लाटेवरती चार गोष्टींने स्वार होऊन उधळीत जावे

------ हा सल्ला नीटसा कळला नाही! पहिल्या दोन कडव्याच्या मानाने हे कडवे जरा कमी पडते असे वाटते.
प्रामाणिक मत! राग नसावा.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

(जयन्ता५२)