ह्यात कोणताही सल्ला नाही.
प्रामाणिक प्रतिसादाने कविता कुठे कमी पडली ते तरी समजले. धन्यवाद. कोणताही सल्ला न देत तटस्थपणे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन लेखनात आला तर लेखानाचा दर्जा उंचावतो, तसे करण्याचाच माझा प्रयत्न राहील.
सहवासात आलेल्या माणसांचे नकळत आपण चित्र रेखाटत जातो, त्या व्यक्ती अस्तित्वात असतील किंवा नसतीलही. उदाहरण द्यायचे झाले तर जे काही वाचतो त्या कथेतील पात्रांविषयी, लेखकाविषयी, कवीविषयी एक संकल्पना निर्माण होते, मग एकमेकांशी बोलताना ह्याच व्यक्तिगत चित्रात अनेकांकडून अनेक रंग भरले जातात. आता ही कथापात्रे , जी माणसे अस्तित्वातही नाहीत तरी त्यांचे चित्रण आपण करत जातो. माणूस जिवंत असेल तर मग तर अशा ह्या कर्णोपकर्णी वाढत जाणाऱ्या कथानकाला सीमाच नसते. ह्याच अनुभवावर ही कविता आहे. थोडक्यात सांगायचे आपल्याबरोबर इतरांच्या आयुष्याच्या पाटीवरही आपण अशाप्रकारे लिहीत जातो. कित्येकदा त्यांच्या नकळत.
'लोकसत्ता ' मध्ये गेल्या शुक्रवारी 'कविता महाजन' ह्यांचा एक लेख आहे .त्यात त्यांनी या मनोवृत्तीमुळे आलेले त्यांचे अनुभव कथन केले आहेत. तसेच अनुभव कित्येकांना येतात असे मला वाटले. म्हणून मनात जे विचार आले ते कवितेतून प्रकट केले आहेत.