"नांव सोनूबाई, हाथी कथलेचा वाळा !"
जळगांव जिल्ह्यातली व शहरातली पाण्याची परिस्थिती आठवली.....
मुंबईत संडासच्या फ्लशलाही आम्ही पिण्याचे पाणी वापरतो !
करणार काय ??? सरकार नियम व कायदे बनवतच नाही व एकदा पाण्याचा अपव्यय करण्याची वृत्ती अंगवळणी पडली की "कथा छान आहे" बोलून मोकळे होता येते.....
काही प्रयत्न स्वतःच करायचे असतात-
मुंबईकरांसाठी माझी सुचना-
१. शॉवर (तुषार स्नान) वगळावे.
२ लघवीला गेल्यावर संडासात पाणी फ्लशने न सोडता टमलर ने सोडावे.
३. शक्य असल्यास कार वॉशींग रोज करणे टाळावे.
४. संडास, बगीचा व साफसफाईच्या कामांसाठी शक्यतो बोअरवेल चे पाणी वापरावे.
५. सांडपाणी समुद्रात न मिसळता - भुगर्भातला पाण्याचा साठा वाढवणे.
ह्याने काय होईल-
पिण्याच्या पाण्याची बचत ! -
जसा पैसा पैशाला खेचतो तसेच पाणी पाण्याला खेचते !
पाणी अडवा... पाणी जिरवा... म्हणजे पाण्याचा साठा वाढेल !!
पुढचे (तिसरे) महायुद्ध जे पाण्यावरून घडणार आहे ते टाळता येईल !!!
गच्चीवर पडणारे पावसाचे पाणी जमीनीत जिरवण्यासाठी फक्त ४०/५० हजारांचा खर्च येतो व ते जन्म भर पुरेल इतके असते.
पाणी हे जीवन आहे -
भारतीय संस्कृती पाण्या (आचमनापासून) पासून सुरू होते व (मेल्यावर) पाणी सोडण्यापर्यंत संपते ह्यातच पाण्याचे महत्त्व लक्षांत घ्या
ह्या कथे कडे फक्त कथा म्हणून बघू नका- पाण्याचे महत्त्व किती आहे त्या दृष्टीकोनातून परत वाचा !
धन्यवाद !