निनाद यांस नम्र विनंती आहे की काहीही लिहू नका. विचार करून लिहा.

तुम्हाला पुन्हा एकदा आत्मपरीक्षणाची गरज आहे.

विचार करण्याची गरज तुम्हाला आहे.

मला वाईट इतकंच वाटत तुमच्या जवळ असलेल्या गोष्टीची तुम्हालाच जाणीव नाही.

 बौद्ध धर्म,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य , आरक्षणाची मदत या सगळ्या

गोष्टी मिळूनही तुम्हाला त्याची किंमत नाही. या सगळ्या गोष्टी मिळूनही

५० वर्षात दलित समाजाचा विकास झाला नाही तर इतर समाजा कडे

कशाला बोट दाखवता.  ५० वर्ष पुरे नाही अजून काही वर्ष लागतील हे मान्य.

पण असेच दुसऱ्याकडे बोट दाखवून अन्याय होत आहे हा विचार केला तर

अजून किती वर्ष लागतील सांगता येत नाही.

माधव कुळकर्णीच्या मताशी पुन्हा एकदा सहमत मी फिरून तुमच्याच मुद्द्याकडे आलो.

हा विचार मराठी समाजाला परप्रांतीयाबद्दल सुधा असतो.

की परप्रांतीयामुळे मराठी माणसाचा विकास होत नाही, परप्रांतीयामुळे मराठी

माणसावर अन्याय होत आहे.

मी विचार करतो माझा स्वतःचा विकास करणं जर माझ्याच हातात आहे तर हे परप्रांतीय माझ्यावर कसा अन्याय करतील ?

दलित मराठी आणि मराठी हा भेद नका करू ते मुंबईला आणि मराठी माणसाला परवडण्यासारखं नाही. हा भेद करणं आणि दुसरे आपल्यावर अन्याय करत आहेत

हा विचार करणं म्हणजे राजकीय स्वार्थाला बळी पडण्यांसारखं वाट्त.

आत्मविश्वास वाढवण्याचा हा शेवटचा प्रयत्न.

धन्यवाद.