चक्रपाणि,
मित्रा! स्तिमित केलस रे बाबा! तुझ्या अनुभवविश्वाचे क्षेत्रफळ व खोली,सदर विषयातील सखोल चिंतन व कल्पक प्रयोगशीलता, तसेच तोल-मोलके बोल वाचून 'प्रेम' या विषयावरच्या (आधीच विपुल असलेल्या) मराठी साहित्यात मोलाची भर पडत आहे.
वयाच्या मानाने तू काळाच्या पुढे आहेस.शोध-पातळीवरचे हे ज्ञान अनेक भावी प्रेमवीरांना मार्गदर्शक ठरेल.माजी (धारातीर्थी पडलेल्या) प्रेमवीरांना स्मरणसौख्याचा आनंद व सुरेश भटांच्या भाषेत '...वय निघून गेले'चे दु:ख एकाच वेळी अनुभवता येईल.
तू 'प्रेम' या विषयावर एखादी 'मदत-रेषा' (हेल्प-लाईन) का सुरू करावीस ही विनंती.तितकी पात्रता तुझ्यात नक्कीच आहे!
(स्तिमित) जयन्ता५२
तुला लेखनात कुणाचे सक्रिय साहाय्य मिळत असावे... अशी दाट शंका आहे!! (ह̱. घ्या)