आणि त्याने होणारी दमछाक रात्री गड सर करताना टाळता येते.. रात्रीच्या २-३ तासाच्या विश्रांती नंतर ताजेतवाने होऊन दिवस भराचा वेळ गिरिभ्रमणाला वापरता येतो.
चंद्र प्रकाशात चालण्याचा जो आनंद मिळतो तो काही औरच असतो हे सांगणे न लगे..
(अवघड चढण \ खडक माथा दिवसा उजेडी जास्त भयाण व कठीण वाटतो.. रात्री अंधारत विजेरीच्या प्रकाशात तुम्हाला फक्त एक ते दीड फुटा पर्यंतच दिसत असल्याने ती भीती वाटत नाही हे माझे वैयक्तिक मत आणि अनुभव आहे)
केशवसुमार