आपले म्हणणे बरोबर आहे.पण यावर तोडगा काय.
मी जेव्हा भेया हातपाय पसरी हे नाटक बघुन आलो तेव्हा माझ्या सवर्ण मित्राने मला प्रश्न केला की दलित मराठी माणूस आणि मराठी माणूस एकत्र आला पाहिजे. म्हणजे भेद करणारा कोण होता. तेव्हा वाटले याला असे बोलावेसे कसे वाटले. मुळात नाटक भैयावर होते . तिथेच मला त्याच्याबद्दल शंका आली.बोललो नाटक मराठी माणसाला एवढे विचार करावयास लावते. तरी हा असा बोललाच कसा. या विषयावर आमच्या कट्ट्यावर चर्चा झडल्या पण तोडगा निघाला नाही उलट भांडणे झाली. म्हटले आता मनोगतावर लिहावे.
मी सुरवातीला जेव्हा परप्रांतियांबाबत लिहीले तेव्हा बहुतेकांनी परप्रांतियांच्या बाजूने लिहीले .म्हणून डोक्यात विचार आला की आता मराठी माणूस आणि दलित मराठी माणूस यांच्याविषयी लिहावे. फक्त मराठी अस्मितेच्या प्रश्नावर यांनी एकत्र यायचे का इतर वेळी काय. काहीजण आरक्षणावर घसरले मला वाटते . हेच मला अपेक्षित होते.शेवटी ज्याला त्याला राग येतो तो आरक्षणाचा. आपण विषय मांडतो त्याविषयावर बरेच वाद होतात. पण तोडगा निघू शकत नाही.त्यासाठी नरमाईचे धोरण हवे असे वाटते. चारही बाजूंनी अभ्यास असावा.
आपला
कॉ.विकि