प्रदिपराव,
ह्या लेखाचा एक धावता आढाव / परामर्श घेऊया....

त्याच अनुषंगाने नुकत्याच महापालीकेच्या निवडणुका झाल्या त्यात शिवसेना जिंकली त्या विजयाचे. शिवसेनेने वर्णन केले मराठी माणूस भडकला भगवा झेंडा फडकला. पण मराठी माणूस म्हणजे नेमका कोण त्यात मराठी दलित पण आला की नाही ते कळत नाही.निवडणुकीत त्या त्या प्रभागांनुसार मराठी मतदारांबरोबर दलित मराठी मतदार मोजला(धरला) जात होता का ?

मुळ लेखकाचा एक मुद्दा !

त्यावर माझ्या लांबलचक प्रथम प्रतिसादात संयुक्त महाराष्ट्राच्या विषयावर भर मी दिलेली होती.  

सध्या परप्रांतीयांच्या मस्तीमुळे मराठी माणसांमध्ये कोणी कोणाला कमी लेखणार नाही आणि कोणी स्वतःहून स्वतःला कमी लेखू नये ही विनंती.

निनाद ह्यांचा प्रतिसाद व सामंजस्य दाखवण्याचा केलेला प्रयत्न.

कांबळींचा तो विनोद, मराठी दलित विरूद्ध मराठी माणूस, हे मुद्दे अतिशय हास्यास्पद आहेत. किंबहुना हे मुद्दे नाहीतच.

प्रसाद ह्यांचे मत !

ही चर्चा चालू करण्यामागे 'देऊ एक खमंग पुडी सोडून, आणि मग बघू काय मजा येते ती' असा हेतू होता की काय अशी शंका येते.

आपले त्यावर आलेले मत ! 

विकींचा मुद्दा फालतु वाटत असेल तर एक महीना कांबळे आडनाव लावून फिरा.....

नंदकिशोर !

अर्थात त्यावर आपण मुद्देसुद उत्तर दिलेच होते.

आपल्या पैकी किती जणांनी वरिल प्रतिसाद लिहीताना प्रशासकांनी लिहीलेले नियम पाळलेले आहेत. मला वाटत मी ते पाळलेले आहेत.

इति श्री. विकी !
ह्यात प्रशासकांना व नियमांना का आणले गेले तेच कळायचे / कळवायचे राहून गेले असावे !

बऱ्याच मराठी हौसिंग सोसायट्यांत तर दलितांना घर घ्यायचे असेल तर त्यांना प्रवेश नाही.
आणि मी तर बऱ्याच जणांच्य तोंडातुन ऐकले आहे की लग्न कोणाशीही करीन पण ह्या समाजातील पोरिंशी करणार नाही.
लिहीण्यासारखे बरेच काही आहे. पण जेवढा हा मुद्दा जेवढा खोलवर जाऊन मांडणार तेवढेच मनोगतावरिल काही बुद्धिमान त्याचा वेगळा अर्थ लावणार.

कॉम्रेड साहेबांनी लिहीलेले हे अजून काही मुद्दे !

स्वतःवर अन्याय होतो आहे हे सारख दाखवून किती वर्ष स्वतःची आणि स्वतःच्या समाजाची फसवणूक करणार आहात ?

निनाद-

हे तोपर्यंत चालेल जोवर अंगचे कलागुण दाखवल्यामुळेच उत्पन्न हाती पडेल..... मग तो ब्राम्हण असो की मराठा की अनुसुचित जातीतला उमेदवार !

माझा निनाद ह्यांच्या विचारांवर प्रतिसाद-

मराठी संस्कृतीत दलित मराठी माणुस कसा बसतो ते स्पष्ट करा.

कॉम्रेड साहेबांचा एक नवीन प्रश्न !

एका विनोदावरच तुम्ही जर मराठी माणूस आणि दलित मराठी माणूस वेगळा करत असाल तर तुमच्या मते मराठी माणूस आणि दलित मराठी माणूस किती वेगळा असेल आणि किती वेळा त्याच्यावर अन्याय झाला असेल ह्याची कल्पनाच न केलेली बरी. तुम्हीतर त्याला मराठी संस्कुतीतच बसवत नाही.
म्हणून मला वाटत मराठी माणूस आणि दलित मराठी माणूस एकच आहे आणि मराठी संस्कुतिपासुन ही वेगळा नाही.

निनाद ह्यांचे मत !

मराठी माणसाला परप्रांतीय जवळचे वाटतील पण बौद्ध मराठी माणूस जवळचा वाटत नाही. ही वस्तुस्थिती आहे.

कॉम्रेड साहेबांचा अजून एक मौलीक विचार !

म्हणूनच म्हटले की ह्या कथेला अंतच नाही !
इटस ऍन एंडलेस स्टोरी !!

त्यावर माझा प्रतिसाद !

दलित मराठी आणि मराठी हा भेद नका करू ते मुंबईला आणि मराठी माणसाला परवडण्यासारखं नाही. हा भेद करणं आणि दुसरे आपल्यावर अन्याय करत आहेत
हा विचार करणं म्हणजे राजकीय स्वार्थाला बळी पडण्यांसारखं वाट्त.
आत्मविश्वास वाढवण्याचा हा शेवटचा प्रयत्न.

निनाद ह्यांचे आर्जव !

मराठी माणूस आणि दलित मराठी माणूस यांत भेद करणारा कोण तर मराठी माणूस . आता १४ एप्रिल जवळ येतेय तेव्हा पहा तेव्हा पहा दलितांना कसे टोमणे मारले जातात ते.

कॉम्रेड साहेबांनी विषय एकदम १४ एप्रिल वर नेला !

तेव्हा तुमच्या माझ्या सकट आपण सर्वांनी हा प्रश्न दुसऱ्याला न विचारता स्वत:लाच विचारावा आणि त्याचे प्रामाणिक उत्तर स्वतःलाच द्यावे. जोपर्यंत आपण स्वतःला पूर्णपणे सुधारू शकत नाही तोपर्यंत असे प्रश्न दुसऱ्यांना विचारण्यात काय अर्थ आहे? प्रत्येक माणसाने सुधारणेची सुरुवात आपल्या स्वत:पासून करावी. समाजाची चिंता करू नये. आपण सुधारलो तर समाजही सुधारेल. ही प्रक्रिया अतिशय सावकाश आणि दीर्घकाल चालणारी आहे. 'खा तूप आणि दाखव रूप' अशासारखी नाही हे लक्षात ठेवावे. निदान समाजात तेढ निर्माण होणार नाही अशी वक्तव्ये करण्याचे टाळले तर ते एकूण समाजस्वाथ्याच्या दृष्टीने हितावह होईल आणि वातावरण गढूळ होणार नाही. हा विषय अतिशय गहन असल्यामुळे सद्या इतकेच पूरे. विकि मला वाटते एवढ्याने आपले समाधान होईल असे वाटते.

श्री अत्यानंदांसारख्या जेष्ठांनी समजावण्याचा केलेला एक प्रयत्न !

या विषयावर आमच्या कट्ट्यावर चर्चा झडल्या पण तोडगा निघाला नाही उलट भांडणे झाली. म्हटले आता मनोगतावर लिहावे.

त्यावर "आजोबांना" कॉम्रेड साहेबांचा प्रतिसाद !

तुम्ही फारच गोंधळलेले आहात अस तुमच्या लिखाणावरून वाटत. कधी याच्याकडे कधी त्याच्याकडे आणि आता तर चक्क माझ्याकडे बोट दाखवत आहात. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की अन्याय होत आहे हे दाखवत राहणं फार सोपं असत पण तो सहन करून स्वतःचा विकास करणं तितकं सोपं नाही.

निनाद ह्यांचे प्रतिउत्तर !

मी गोंधळलेलो नाही आहे उलट तुच काहीही लिहून गोंधळ निर्माण केला आहेस . मला वाटत तू उच्चभ्रू वर्गात वावरत असल्याने तुला काहीही कळत नाही आहे. वरचेवर लिहिणे सोपे असते तेच तू करत आहेस .

कॉम्रेड !

दलितांचे गंभीर प्रश्न आहेत गेली कित्येक शतके, व ते मुळापासून दूर व्हावयला हवेत. त्यासाठी काय केले पाहिजे, असे आपणाला वाटते? इथे एक नमूद करावेसे वाटते: वरील बरेचसे प्रतिसाद शहरी मंडळींचे होते असे वाटते. तरीही किमान एकतरी प्रतिक्रिया (नंदकिशोर ह्यांची), जी पण शहरातूनच आलेली होती, ती खूप बोलकी होती. 'अरे, तू आमच्यातलाच वाटतोस!' हा डंख जर दलितांवर शहरात सहजपणे जाता जाता होत असेल, तर गावात काय परिस्थिती असेल? मी त्यांच्या प्रतिसादावर लिहिल्याप्रमाणे १९७९ मध्ये अवचटांनी लिहिलेल्या 'गोसाव्याची तोड' ची भीषण, मन सुन्न करणारी परिस्थिती आता थोडीतरी बदललेली असेल काय? खैरलांजी प्रकरण बघता मलातरी शंका वाटते.

हा आपला समजुतदार पणाने आलेला प्रतिसाद !

प्रश्न हा आहे की फक्त कांगावा करुन उपयोग आहे का ? इथे इतकी मंडळी विकी ह्यांना समजावण्याच्या प्रयत्नांत आहे तरी पहिले पाढे पंचावन्न !

माझ्यापुरता हा विषय येथेच संपला आहे !
धन्यवाद...... !