वाचनांत आलेली होती बातमी...

शुद्ध मराठी (shudhdha marathi) ह्यांच्या प्रतिसादातील काही मुद्द्याशी सहमत ज्यांच्याशी असहमती आहे त्यावर थोडे मंथन वजा रवंथ करतोय:  

महाराष्ट्रात भाषा शिक्षणाचा दर्जा अत्यंत हलका आहे !

माझे स्वतःचे शिक्षण मराठी माध्यमातून झालेले आहे- एक शुद्धलेखन (जात्याच आळशी असल्यामुळे) सोडल्यास माझ्या मराठी, हिंदी तसेच इंग्रजी ह्या तिन्ही भाषा वाईट तर सोडाच; पण यथातथाच असल्याचे कोणाचे मत असेल तर त्याला साष्टांग प्रणिपात !
मनोगतावर मी आजवर अनेक कथा, लेख, चर्चा, गझल व कवितांचे वाचन गेल्या जवळपास दोन वर्षात केले आहे. क्वचित आढळणारा अपवाद सोडल्यास व टंकलेखनाची सवय नसल्याने सुरुवातीला होणाऱ्या चुका सोडल्यास बहुतांश मराठी अस्खलित व अलंकारयुक्त आहे हे आवर्जून सांगावेसे वाटते.
दुसरीकडे 'शुद्ध मराठी' हे स्वतःचे शिक्षण महाराष्ट्रात न झाल्याचे कबूल करत आहेत-
हा विरोधाभास पचनी पडणे जरा अशक्य आहे.

ज्या पालकांची दर दोन-तीन वर्षांनी एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात बदली होते अशांच्या पाल्यांनी कुठल्या शाळेत जावे?

सुक्याबरोबर ओलेही जळते !
हल्ली मराठी भाषेचे शिक्षण घ्यावे लागू नये म्हणून सेंट्रल बोर्ड- आयसीएससी- वगैरे अभ्यासक्रम अंगिकारलेल्या शाळांमध्ये मुलांना दाखल करणारा एक वर्ग निर्माण झाला आहे.
आई बापाचे उभे आयुष्य महाराष्ट्रात गेलेले- कुठेही पाल्य (सध्यातरी) महाराष्ट्राबाहेर जाऊन शिकण्याची शक्यता नाही !
तरी मराठीच्या फक्त आकसापोटीच ह्या शिक्षणक्रमांना जवळ केले जाते.....
ह्या परिस्थितीवर तोडगा कोणता ?
ज्याला महाराष्ट्रात आयुष्य काढायचे आहे त्याला मराठी येणे अनिवार्य असावे का ?
ह्याबाबत ह्या मंडळींनी (ह्या विरोधात असणाऱ्या) स्वतःचा दृष्टिकोन स्पष्ट करावा अशी रावते ह्यांची मागणी असल्यास ती चुकीची आहे का ?

मूळ लेखातील शेवटच्या वाक्यावर थोडेसे-

मराठी शिकवण्यासाठी बॉम्बे स्कॉटिश शाळेवर उद्धव ठाकरेंनी मोर्चा काढावा. त्यात आम्ही सहभागी होऊ,' असे आव्हाड म्हणाले!

थोडक्यात विरोधकांच्या चुका शोधून ह्याबाबत काय करता येईल त्याचा विचार करण्यास नकार देणे !