माधव, विकि व निनाद,

माझ्या प्रतिसादाला आपापल्या परीने मुग्ध (विकि), जेव्हढ्यास तेवढे (निनाद) अथवा सविस्तर (माधव) उत्तरे दिल्याबद्दल धन्यवाद.

निनाद व माधवांनी 'हा विषय आपल्यापुरता येथे संपला' असे जाहीर करून टाकले आहे, तेव्हा आता थांबायलाच हवे. खरे तर विकिंच्या भोंगळ युक्तिवादांतून बाहेर काढून आता तर कोठे आपण सर्व खऱ्या, दलितांच्या विषयाबद्दल चर्चा करू लागलो होतो.

आपल्या पैकी किती जणांनी वरील प्रतिसाद लिहिताना प्रशासकांनी लिहिलेले नियम पाळलेले आहेत. मला वाटत मी ते पाळलेले आहेत.

इति श्री. विकी !
ह्यात प्रशासकांना व नियमांना का आणले गेले तेच कळायचे / कळवायचे राहून गेले असावे !

प्रशासकांनी 'भोंगळ मुद्दे मांडून चर्चेला सुरुवात करू नये', असा नियम केला नसावा बहुदा! असो. एका गंभीर विषयावरची चर्चा सुरुवातीच्या वाईट मांडणीमुळे सुरू व्हायच्या आतच संपली, हे दुर्दैव.

पुढे कधितरी जमल्यास दलितांच्या विषयावर परत चर्चा करूया.

प्रदीप