आनंद साधले यांनी एका संस्कृत नाट्यप्रकाराचे "चतुःभ्राणी" या नावाने अनुवादीकरण केलेले आहे. त्यात प्रस्तावने मध्ये या प्रकाराला दिवाकरांची नाट्यछटा हा प्रकार समांतर अथवा जवळचा आहे असे लिहिल्याचे आठवते.

सन्जोप रावांनी सांगितल्या प्रमाणे कमीत कमी शब्दात मनोविकारांचे प्रकटन अतिशय उत्तम प्रकारे केल्याचे जाणवते.

आपल्या पुण्यात काही लोक प्रत्येक वर्षी दिवाकरांच्या नाट्यछटांचे लहान मुलांकडून अविष्करण करून घेतात.