ताजी बातमी:--मराठी भाषेच्या वापरावरील चर्चेच्या वेळी आज विधान परिषदेत दोन वेळा गणपूर्ततेसाठी आवश्‍यक सदस्य उपस्थित नव्हते. त्यामुळे सभागृहाची बैठक एकदा दहा मिनिटांसाठी आणि पुन्हा पंधरा मिनिटांसाठी स्थगित करावी लागली. चर्चेचा आजचा तिसरा दिवस होता. ......आजसुद्धा ही चर्चा अपुरी राहिली. ती उद्या पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.