"अरे तू आमच्यातलाच..." ह्यावर कोणालाच प्रतिउत्तर द्यावेसे वाटले नाही.

मी आज आयटी मधे आहे.. कुलकर्णी साहेब मला तुमच्याकडुन वरिल व खालील टोमण्यांना प्रतिसाद हवाय..

"सरकारने नोकरी ठेवली असताना इथे काय करतोयस..

(१४ एप्रिल व ६ डिसेंबर ला) काय रे गेला होतास की नाही?

'हे' आता चोपाटीची घाण करणार (अनंत चतुर्दशीचे काय?)

ओपन मधे ऍडमिशन मागून आमची सिट खातोय..."

मला खात्री आहे की तुम्ही असे कोणाला बोलत नसाल म्हणूनच ऐकणार्याचा विचार करुन सांगावे...

मी प्रायव्हेट सेक्टर मधे आहे कारण मला आरक्षणाशिवाय सरकारी नोकरी हवी होती...

माझ्यासारखे बरेच भेटतील....

आता 'कांबळे' आडनावाबद्दल:

माझे एक मित्र "राज कांबळे" यांना जाहिरात क्षेत्रातला गोल्ड पेंसिल पुरस्कार मिळाला.. यावर मला मिळालेले दोन अभिप्राय:

"कांबळे असूनही.........."

बरे तिकडे आरक्षण नाहिय नाहितर...."

क्रुपया आता सांगा मी काय करायला हवे.. खाजवून खरुज काढणार्याची बोटे मोडावीत का?