गोळेकाका,
समुद्रातून नैसर्गिक वायूही मिळत असतो.
आपण लेखात जे वरील वाक्य वापरले, त्यावरुन आपण कशा संदर्भात सांगू इच्छित आहात ते प्रथम समजले नाही.
तर, मला जी माहिती आहे त्याप्रमाणे नैसर्गिक वायू फक्त समुद्रातील तेलविहिरीत मिळतो असे नसून इतरत्र सुद्धा मिळू शकतो.
माझ्या माहिती प्रमाणे, नैसर्गिक वायू हा भूपृष्ठांतर्गत ज्या तेलविहिरी असतात त्यात आढळतो. उच्च दाब आणि तपमान या मुळे द्रवस्वरुपातले तेल वायू रुप होवून तेलाच्या वर मातीच्या कणांतील पोकळीमध्ये साठून राहते. तेलविहीर खणल्यावर आधी हा वायू मिळतो. हा वायू जमिनिवरील आणि समुद्रातील दोनही प्रकारच्या तेलविहिरीतून मिळू शकतो. (कोळशाच्या साठ्यांत सुद्धा मिळतोच.) पुढे हा वायू वाहतूकीच्या सोयीसाठी द्रवरुपात आणतात. त्याला एल.एन. जी. म्हणजे 'लिक्विफाईड नॅचरल गॅस' म्हणतात. पुढे तोच सी.एन.जी या स्वरुपात इंधन म्हणून आपण वापरतो.
--लिखाळ.